Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी- अंबादास दानवे

परभणीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Published by : Sagar Pradhan

यंदा राज्यभरातच प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीत आज शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते. या मोर्चानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून दानवेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले दानवे?

परभणीत माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की,"मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू अशी घोषणा केली. मात्र मागच्या 110 दिवसात राज्यभरामध्ये जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फसवी आहे. सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री सध्या वेगळ्याच धुंदीत आहेत. असे दानवे यावेळी म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले जात आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव