राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राज्यपालांच्या सर्वच स्तरातून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. त्यावरूनच आता राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.
काय म्हणाले दानवे?
भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधानं करतात. महात्मा फुलेंविषयी, शिवरायांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आक्षेपार्ह विधानं करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात, असं दानवे म्हणाले.
कोश्यारी सातत्याने अशी गंभीर विधानं करतात. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही त्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही, असं दानवे म्हणालेत.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.