Aditya thackeray  Team Lokshahi
राजकारण

राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त केलं पाहिजे- आदित्य ठाकरे

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच काल औरंगाबादेत बोलत असताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यावर एकच राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीका होत होती. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व जाणूनबुजून होते की, काय वेगळं काही असू शकत. पण, राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मला वाटतं राज्यपाल कोश्यारी यांचं हे पहिले वक्तव्य नाही. त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत. हे सर्व जाणूनबुजून होते की, काय वेगळं काही असू शकत. पण, राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. राष्ट्रपती महोदयांनी राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त केलं पाहिजे. राष्ट्रपती हे सुद्धा राज्यपालांना माफी मागण्यास सांगू शकतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असे वादग्रस्त व्यक्तव्य करावं, हे अपेक्षित नव्हते. अनेक वर्षांपासून बरेच राज्यपाल पाहिले. त्यांची भेट घेतली. पण, असे राजकीय राज्यपाल कधी आयुष्यात बघीतले नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू