राजकारण

बाळासाहेब असते तर ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून अन्...; शिवसेनेचा शिंदे गटावर निशाणा

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेनेने सामना आग्रलेखातून त्यांना अभिवादन केले आहे. तसेच, भाजप व शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेनेने सामना आग्रलेखातून त्यांना अभिवादन केले आहे. तसेच, भाजप व शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल. कालचे वर्ष व आजचे वर्ष यात मोठा फरक आहे. भारतीय जनता पक्षाने ‘बदला’ घ्यायचा म्हणून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना पह्डली. ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले. अर्थात हा बदला नसून ‘राष्ट्रद्रोह’ आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेच्या पाठीत भाजपने चाळीस खंजीर खुपसून देशद्रोहच केला. हा देशद्रोहासारखाच प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्रीय मातीचा माणूस कधीच म्हणता येणार नाही. शिवसेनेतील एका ‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली गेली. हा कुणास बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची 11 कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे, असा निशाणा शिवसेनेने शिंदे गटावर साधला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगत. भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि पह्डून काढले असते. महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चाळीस बेइमान खंजिरांसह शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब सगळ्यांचे होते; पण त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण