राजकारण

शिवसेना आक्रमक; एकनाथ शिंदेंसह 15 बंडखोरांवर होणार कारवाई?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi) शिवसेनेच्या (ShivSena) बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना उद्या नोटीस जारी करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ सातत्याने वाढत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदारांना पुढे येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर, शिवसेनेचे 42 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. उध्दव ठाकरेंनी वारंवार आवाहन करुनही आमदार न परतल्याने शिवसेनेने आता कडक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजवण्यात येणार आहे. यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेनेची बैठक होणार आहे.

या निलंबन यादीमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, बालाजी कल्याणकर, अनील बाबर, लता सोनावणे, संजय शिरसाठ, संदीपन भुमरे, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर, संजय रयमुळकर, बालाजी किणीकर, रमेश बोरनारे आदी 16 आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, शुक्रवारीही उध्दव ठाकरेंनी लाईव्हद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. एकदा बोलतात, मुख्यमंत्री भेटत नाही, एकदा बोलतात फंड देत नाहीत. नेमकं काय ते यांनाच समजत नाहीये. मी एकदा एकनाथ शिंदे यांनाच बोलवून जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादी त्रास देत असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. तसेच भाजपसोबत जाण्यासाठी आमदारांचा माझ्यावर दबाव आहे, असं मला शिंदेंनी सांगितलं होतं.

कुणी कुटुंबाची बदनामी करत असेल तर त्यांच्यासोबत मला जायचं नाही. पहिले आमदार माझ्यासमोर येऊद्या माझ्यासमोर बोलूद्या मग काय तो निर्णय घेता येईल. आमदार माझ्यासमोर येऊन मला बोलले असते तेव्हाच मार्ग निघाला असता, असंही मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू