Shambhuraj Desai | Sushma Andhare  Team Lokshahi
राजकारण

मंत्री शंभुराज देसाई यांची अंधारेंवर विखारी टीका; म्हणाले, कावीळ...

पूर्वी सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलले ते चालतं का असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

Published by : Sagar Pradhan

कल्पना नळसकर। नागपूर: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावरच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कावीळ झाल्यावर जस सगळं पिवळ दिसतं तशी अवस्था त्यांची झाली आहे. अशी टीका देसाई यांनी यावेळी अंधारेंवर केली.

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई?

चार महिन्यापूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे शिंदे गटचे आमदार यांच्या बाबतीत कुठलाही ठोस पुरावा नसताना आरोप करत आहे हे चुकीचं आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शहाजी बापूने कष्टातून जमिन विकत घेतली, घर बांधलं असेल तर ते त्यांच्या डोळ्यात खूपत आहे, सुषमा अंधारेंना कावीळ झाल्याची टीका शंभूराजे देसाई यांनी केली. कावीळ झाल्यावर जस सगळं पिवळ दिसतं तशी अवस्था त्यांची झाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल सुषमा अंधारे सेनेत येण्यापूर्वी काय बोलल्या होत्या याची आठवण करून द्यावी. अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सभागृहात नागपूर मध्ये एनआयटीच्या उच्च न्यायालयाचा आलेला निकाल गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. सुषमा अंधारे या सभागृहात नाही आणि त्यांना कधी सभागृहात येण्याची संधी मिळणार नाही असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. किती कडक शब्दात बोलले हे वरच्या नेत्यांना दाखवण्यासाठी अंधारे बोलत असल्याची ही टीका शंभूराजे देसाई यांनी केली. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आहे. पूर्वी सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलले ते चालतं का असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण