Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला; म्हणाले, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी...

अनेकांनी विचारलं पुतळा कुठे असेल मात्र इथे पुतळा नाही. हे म्युझियम प्रेरणा स्थान असणार आहे.

Published by : Sagar Pradhan

आज मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच त्यांनी या स्मारकाचे काय वैशिष्ट असणार यावर सुद्धा भाष्य केले आहे. सोबतच उद्धव ठाकरेंनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

शिंदे आणि फडणवीस यांना टोला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून मदत होतेय, मात्र त्यासंदर्भात सुभाष देसाई उत्तर देतील. आधी मी बोलतो नंतर देसाईंना माईक देतो, नंतर त्यांच्या हातून माइक परत घेणं बरोबर नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरेंनी स्मारकाबद्दल दिली माहिती

स्मारकाबद्दल माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 17 तारखेला दहा वर्ष पूर्ण होतील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतीदिन आहे. स्मारकाचा विषय मध्ये मध्ये चर्चेत येतो. नेमकं स्मारक कधी आणि कसं होणार याबद्दल कुतूहल आहे. हे प्रेझेंटेशन बेसिक स्वरुपाचं आहे, बाकी देखील अनेक गोष्टी आपण तिथे करणार आहोत. म्युझियम संदर्भात काम करत आहेत त्यांच्याबद्दल देखील चर्चा झाली.

अनेकांनी विचारलं पुतळा कुठे असेल मात्र इथे पुतळा नाही. हे म्युझियम प्रेरणा स्थान असणार आहे. काहींना वाटतोय की वेळ लागतोय, मात्र ती हेरिटेज वास्तू आहे. त्या वास्तूला धक्का न पोहोचवतो काम करतो आहोत. संग्रहालयाला धोका पोहोचणार नाही असे बांधकाम करावे लागतंय, बाजूला समुद्र देखील आहे, जमिनीखाली देखील बांधकाम करावं लागतंय, स्मारकाबद्दल अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी माध्यमांना दिली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी