गोपाल व्यास|वाशिम: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे हे बाहुली आहेत आणि त्यांचा रिमोट अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. असे विधान केलं होतं. त्यालाच आता शिवसेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी उत्तर दिले. त्या म्हणतात जे स्टेटमेंट संभाजीनगरच्या खासदारांनी केलेला आहे त्यामध्ये कुठलाही तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बाहुबली आहेतच कारण त्यांच्या मागे ५० आमदार आणि 14 खासदार गेले. आणि त्या अर्थाने ते बाहुबली आहेत. आणि महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल याआमदारांच्या आणि खासदारांच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये आलेला आहे.
कुठेतरी काही एखादा स्टेटमेंट करायचं आणि त्यामुळे वेगळ वातावरण निर्माण करायचं हे त्यांचे काम राहिले आहे. त्यांना काही फार सिरीयस घेण्यासाठी कारण आहे असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे हातात हात घालून या महाराष्ट्रात काम करत आहेत आणि ती नंबर वन जोडी आहे आणि म्हणून साहजिकच आहे ते काम चांगले करत आहेत. कोणाच्या तरी पोटामध्ये आज शुळ उठत आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक लोक बडबडता आहेत अनेक लोक वेगवेगळे स्टेटमेंट देऊन आपली प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी आपल्या कर्तुत्वाने या महाराष्ट्रातल्या जनतेला जिंकत आहेत. आणि खर्या अर्थाने महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांना ते एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ते काम करता आहेत अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल निर्माण झाली आहे. आणि म्हणून कोणाकडे कोणाचा रिमोट आहे त्यापेक्षा जनतेचा रिमोट बनण्याचं काम ते करत आहेत.