राज्यात सध्या अनेक मोठा राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावरच आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
राऊतांच्या टीकेला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, 'संजय राऊत पिसाळलेली औलाद आहे. आम्ही त्याला महत्त्व देत नाही, आमच्या आमदार, खासदारांना मारणारा अजून या महाराष्ट्रात पैदा झाला नाही. ज्याचे हात आमच्या आमदार खासदारांवर पडेल, त्याचा हात तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यामुळे भाडोत्री लोकांच्या जोरावर संजय राऊतने अशी भाषा वापरू नये. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे सैनिक आहोत. हे संजय राऊतने लक्षात ठेवावं. शिवसेना भाजपाच्या लोकांना लफंगे म्हणणाऱ्या राऊतला आठ-दहा दिवसातच कळेल की त्याने जो चोर शब्द वापरला त्याची त्याला काय शिक्षा मिळते. त्याने फक्त सुरक्षा सोडून बाहेर यावं, मग लफंगे काय असतं, हे आम्ही त्याला दाखवू” असा प्रखर इशारा गायकवाड यांनी राऊतांना दिला.