शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सध्या सुरु आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे यात शिवसेनेच्या दोन आमदारांची अपात्रता प्रकरणातून सुटका होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेतील शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपणार आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनीषा कायंदे व विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात अपात्रतेच्या याचिका सादर केल्या आहेत. मात्र या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याने त्यांची अपात्रतेपासून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.