आज निवडणूक आयोगाकडून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप किंवा शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहता सर्वांचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. त्यावरूनच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाले की, भाजपने कधीही संवेदनशील नितीपूर्ण आणि युती पाळत राजकारण केलेले नाहीय. सातत्याने उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. मात्र, आम्हीच कसे सच्चे असा शेलार, दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी असा दावा वारंवार केला आहे.2019 मध्ये 40 मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात युती धर्म न पाळता बंडखोर उमेदवार उभे केले. असा आरोप यावेळी अंधारे यांनी भाजपवर लावला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बार्शी मध्ये जाणीवपूर्वक शिवसेनासेना उमेदवार समोर अपक्ष उमेदवार उभे करने किंवा उरण मध्ये सेनेचे उमेदवार भोईर यांचा विरोधात अपक्ष उभा करणे, ह्याच पद्धतीने अंधेरीमध्ये देखील रमेश लटके यांचा विरोधात मुरजी पटेल ह्यांचा विरोधात उभे केले होते. तेव्हा भाजपने कांगावा केला की मुरजी पटेल आमचा काही संबंध नाही भाजपचा हा कांगवा उघडा पडला आहे.भाजप ने आता अधिकृत उमेदवार दिला आहे त्यामुळे त्यांचा बुरखा घेतलेला उघडा पडलेला आहे. भाजप कायम युती धर्म न पाळता शिवसेनेचा पाठीत खंजीर खुपसला शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केला. असे वक्तव्य यावेळी सुषमा अंधारे यांनी केले.