मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिंदे गटावर जोरदार घणाघात केला आहे. दिवार सिनेमात जसे अमिताभच्या हातावर गोंदलेलं होतं मेरा बाप चोर आहे. तशीच अवस्था त्यांची झाली आहे. त्यांच्या कपाळावर गद्दार लिहिलं गेलं आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आता हे ऐकावच लागणार आहे, असे शरसंधान त्यांनी शिंदे गटावर साधले आहे.
संजय राऊत म्हणाले की, नाशिक हे एक अस शहर जिथे काहीच डॅमेज होत नाही. जी शिवसेना इथे आहे ते सगळे इथे आहे. एक-दोन आमदार गेल्याने पक्ष जात नाही. निवडणुका भीतीपोटी टाळत आहे. नव्या चिन्हावर शिवसेना विजयी होईल. खासदार गोडसे यांचे करिअर संपली. कारण त्यांना आम्ही घडवलं. सुहास कांदे असो की दादा भुसे यांनी परत निवडून येऊन दाखवावा. आम्ही लोकांमध्ये जातोय व आम्हाला तो विश्वास आहे. जे जाताय ते पालापाचोळा आहे ते इकडे तिकडे उडत असतात. जे शिंदे गटात गेले त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले आहे.
वैजापूरच्या आमदाराला चपला मारायच्या बाकी होत्या. पोलीस सुरक्षा आहे म्हणून चाललं आहे. आमची सुरक्षा काढली तरीही मर्दासारखं आम्ही फिरतो आहे. तुम्हाला भीती नसेल तर तुम्ही सुरक्षा काढून फिरून दाखवा. मी क्राईम रिपोर्टर आहे. मला काय चाललं हे कळत. कांदे आणि दादा भुसे यांच्यात जे सुरू आहे ते बाहेर येईल. ठिणग्या उडताय उडू द्या, असे म्हणत शिंदे गटात आलबेल नसल्याचे संकेत राऊतांनी दिले आहेत.
दिवार सिनेमात जसे अमिताभच्या हातावर गोंदलेलं होतं मेरा बाप चोर आहे. तशीच अवस्था त्यांची झाली आहे. त्यांच्या कपाळावर गद्दार लिहिलं गेलं आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आता हे ऐकावच लागणार आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी शिंदे गटावर केला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला हवी. चूल्लुभर पाणीमध्ये डूबायला हवे. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहान आहे. कर्नाटक मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना 12 तोंडाचा रावण, असे म्हणाले. त्यावरून मोदींनी अश्रू ढळले आणि म्हणाले, हा माझा नाही गुजरातचा अपमान आणि महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान होतो तेव्हा? चीड निर्माण होत नाही. मलाही आवडलं नाही मोदींना रावण बोललेल कारण ते पंतप्रधान आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आम्ही बदला घेणारच, असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीत कर्तबगार महिला आहेत. त्यांना मुख्यमंत्री केलं तर काहीही वावग नाही. किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडी कायम राहील. हुकूमशाही थांबविण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊ. महाराष्ट्रातील शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री केवळ 40 आमदारांचा आहे. तीन महिन्यापूर्वी आम्ही क्रांती केली. या पलीकडे बोलत नाही. साडेतीन महिन्यानंतर पुन्हा आमचा मुख्यमंत्री होईल. आम्ही सरदार आहेत लढायला वार झेलायला. वीरात दौडले मराठे साथ, असे आम्ही लढणार आहोत. कदाचित राज ठाकरेंना ते माहित नसेल. अस इतिहासाला बूचन लावलेलं चालणार नाही. शेपटा घालून बसायचं असेल त्यांनी बसाव. मात्र, आम्ही लढणार, असा टोला राज ठाकरे यांचं नाव न घेता संजय राऊतांनी लगावला आहे.