Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण

जेलमधून बाहेर येताच राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले, बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू...

आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील

Published by : Sagar Pradhan

मागील अनेक महिन्यांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. मात्र, आता संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांकडून राज्यभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले होते. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर आपल्या हटके स्टाईलने निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

रॅली चालू असताना राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मी गेल्या शंभर दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोतत, लढत राहू.' असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 'आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र-मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.' असे सूचक विधान देखील त्यांनी यावेळी केले.

'त्यांचं हे तात्पुरतं राजकारण सुरू आहे. आता बाहेर आलोय, हळुहळू कामाला लागू. गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावाल, तर जळून खाक व्हाल. असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे...' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

Sanjay Bansode Udgir Vidhan Sabha constituency: संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान

राज ठाकरे बॅकफूटवर? शिवाजी पार्क ठाकरेंना की शिंदेना?

Raj Thackeray MNS Manifesto; 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी