Nitin Deshmukh  Team Lokshahi
राजकारण

चौकशीनंतर आपल्याला अटक करतील; नितीन देशमुख ACB कार्यालयाकडे रवाना

कपडे बॅगेत भरून नितीन देशमुख निघाले, आज होणार चौकशी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सुरज दहाट | अमरावती : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज चौकशीसाठी एसीबी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. यानुसार एसीबी समोर हजर होण्यासाठी आमदार देशमुख रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी सोबत कपड्यांची बॅगही घेतली आहे. एसीबीसमोर हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील व आत टाकतील. त्या हिशोबाने तयारीला केली असल्याची प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. नितीन देशमुख आज चौकशीनिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन करुन रवाना झाले आहेत. नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे रवाना झाले आहेत.

अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती येथे रवाना झाले आहेत. आपल्याला अटक होईल या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना औक्षण घातले असून कपडे आणि सामानही सोबत घेतले आहेत.

दरम्यान, अमरावतीचे एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील. त्यानंतर आत टाकतील. त्या हिशोबाने तयारीला लागलो आहे. म्हणूनच आज घरून कपडे घेऊन चाललो आहे. कारण की हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे. इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result