राजकारण

कोरोनामध्ये कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बाहेर पडत होते? अरविंद सावंतांचा राज ठाकरेंना प्रश्न

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर सडकून टीका केली. या टीकेला शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. टीका करणं त्यांचा हक्क आहे ते करू शकतात. पण, एखाद्या व्यक्तीच्या आजारपणा बद्दल किंवा व्यंगावर चेष्टा करू नये. कोरोना काळात कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बाहेर पडत होते, असा प्रश्नदेखील त्यांनी राज ठाकरेंना विचारला आहे

अरविंद सावंत म्हणाले की, टीका करणं त्यांचा हक्क आहे ते करू शकतात. पण, एखाद्या व्यक्तीच्या आजारपणा बद्दल किंवा व्यंगावर चेष्टा करू नये. मला वाईट वाटलं की ते एक वाक्य बोलले ते आता बाहेर पडले. सगळ्यांना माहित होत की तेव्हा कोरोना होता. कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री बाहेर पडत होते, असा प्रश्न त्यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.

सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण असं सर्वे झाला आणि त्यात उद्धव ठाकरे यांचं नाव सतत वर होत. त्यांचं कौतुक करणारा मित्र हवा. कौतुक करावं हे बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यांनी लोकांचे प्राण वाचवले. जिथे प्रेत नदीत वाहत होते तिथे आपल्या राज्यात त्यांनी प्राण वाचवले. तेव्हा त्यांनी का दिलदारपणे कौतुक केलं. डॉक्टरांची मुलाखती घ्या ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले. काही जणांना ते बाहेर आले म्हणून वाईट वाटतं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपालांविरोधात आम्ही आक्रमक आहोतच. शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि आक्रमक झालो नाहीत तर हे चुकीचं आहे. सगळे जण त्यांच्या विरोधात एकवटले आहेत, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या काही प्रश्न गळ्याशी येणार आहेत. महाराष्ट्रमध्ये वादळ आलेलं असताना केंद्राने मदत जराही दिली नाही. कोकणातल वादळ ते पाहत देखील नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं बोलत होते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी एक क्लिष्ट अर्ज केला जो शेतकऱ्यांना भरताही आला नाही. देवेंद्र फडणवीस लपवण्यात हुशार आहेत. विमा कंपन्या बदद्ल सभागृहात एकदाही उल्लेख केला नाही, अशी टीका अरविंद सावंतांनी फडणवीसांवर केली.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार