प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा आज दादरमधील शिवाजी मंदिरात लोकापर्ण सोहळा पार पडला. या संकेतस्थळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी भाषण केले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. असे ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर येण्यासाठी अडचण आली नाही आणि येणार नाही, ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती अडचण येणारही नाही. दोघेही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत,
काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून म्हणाले होते उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू आहोत. तेव्हा मी त्याला म्हटले होते एकत्र या असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
"सध्याची परिस्थिती पाहिली तर आपल्या देशाची वाटचाल हुकुमशहाच्या दिशेने चालली आहे. इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचलं पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा."
"न्याय व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. न्यायमुर्ती म्हणून सध्या जे बसले आहेत ते कसे आले आहेत? कायदा मंत्री ज्या प्रकारे बोलतात ते त्यांचं वैयक्तीक मत आहे का? ते स्पष्ट केलं पाहिजे. त्यांचा स्वभाव आहे की पिल्लू सोडायचं, ते मोठ झालं की मग पालकत्व स्वीकाराच, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.