शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी शिवसैनिकांसाठी भावनिक भाषण केले. एकनाथ शिंदे यांना व इतर आमदारांना परतण्याचं आवाहन केले. एकीकडे त्यांचे भाषण सुरु असतांना शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असणारे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांसह 4 आमदार शिंदे गटात पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेना अजूनही धक्क्यातून सावरत नसल्याचे दिसते.
एका दिवसाआधी गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन करत होते. वृत्तवाहिन्यांना बाईट देत होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच गुलाबराव पाटील गुवाहटीला गेले. त्यांच्यासोबत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचं इतर आमदारांनी स्वागत केलं. या आमदारांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही हे 4 आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.
1 गुलाबराव पाटील - मंत्री - जळगाव ग्रामीण
2 योगेश कदम - आमदार - दापोली
3 चंद्रकांत पाटील - मुक्ताईनगर
4 मंजुळा गावित - साक्री - धुळे
काय म्हणाले उद्धव ठाकरे
...हा आरोप अर्धसत्य
आधी प्रशासनाचा अनुभव नसतांना मी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याचवेळी कोरोना आला. त्याकाळात उल्लेखनीय कामे केली. त्याची दखल घेतली गेली आणि पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. माझ्यावर एक आरोप होत आहे की, मुख्यमंत्री भेटत नव्हते. हे गेल्या काही दिवसांपुर्वी बरोबर होते. परंतु त्यानंतर मी भेटायला सुरु केेली. त्यावेळेस मी भेटत नसतांना कामे कधी थांंबली नव्हती.
हिंदूत्व शिवसेना सोडले नाही
शिवसेना कोणाची आहे? काही जण म्हणतात, ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली मी स्वत:च्या ताकदीवर 63 आमदार निवडून आले. काही जण बाळासाहेबांच्या शिवसेनेनंतर मंत्री झाले. तेव्हा त्यांना वाटली नाही का? ही शिवसेना ती नाही.