Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला ४८ तास उलटून गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला (shivsena) मोठे हादरे बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल जनतेशी संवाद साधल्यानंतर जर माझ्याच लोकांना मी नको असेल तर मी वर्षा बंगला सोडून जातो असं म्हटलं आणि त्यानंतर रात्री त्यांनी वर्षा बंगला सोडला. (shivsena eknath shinde will claim and legal fight for that Sanjay Raut)
दरम्य़ान, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, तर त्यावर नक्की विचार करु. आणि यासाठी पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत (Mumbai) यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल", असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील, फक्त पुढच्या २४ तासांत मुंबईत या", असा मेसेज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.