राजकारण

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेला अन् मृत्यूने गाठले; शिवसैनिकाचे मातोश्री बाहेर निधन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत. अशातच एका शिवसैनिकाचा मातोश्री बाहेरच निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कसारा येथील भगवान काळे असे निधन झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे.

शिंदे गटाच्या बंडानंतर पक्ष वाचवण्यासाठी उध्दव ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून मेळावे व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शहापूर तालुक्यातील 50 ते 60 शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. यांसह भगवान काळे वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना आपल्या गाडीतून घेऊन मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात विचारपूसही न केल्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी राजीनामा देत असल्याचे पत्रात सांगितले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना