राजकारण

अजित पवार गटाविरोधात राष्ट्रवादीकडून कारवाई करण्यास सुरुवात; पहिली कुऱ्हाड 'या' नेत्यावर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षही फुटला असून अजित पवार शिंदे-फडणवीसांबरोबर सत्तेत सामील झाले आहेत. याविरोधात आता राष्ट्रवादीने कारवाईची पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिली कुऱ्हाड शिवाजीराव गर्जे यांच्यावर पडली आहे. आमदारांच्या शपथविधीसाठी शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी असल्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे, असे पत्र राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले आहे.

काय आहे राष्ट्रवादीच्या पत्रात?

आपण दि. २ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/ मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे.

त्यानुसार आपणास २ जुलै, २०२३ पासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.

दरम्यान, शिवाजीराव गर्जे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2000 साली प्रवेश केला. पुढे 2009 साली मनसेकडून शेवगाव विधानसभा लढविली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2009 पासून आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत होते. गर्जे हे शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार व वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल