मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तर, चिन्हावरुनही दोन्ही गटात संघर्ष सुरु असून निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. अशात शिवसेनेला दिलासादायक बातमी मिळाली आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचनाही प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवेसना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचनेत दिले आहे.
विधानपरिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी, असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. परंतु, शिवसेनेच्या या निर्णयावर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. आमच्याशी चर्चा न करता शिवसेनेने अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
तर, शिंदे सरकारच्या सत्तास्थापनेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे सरकारचे छोटे खानी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकाराला चांगलेत धारेवर धरले आहे.