मला कटप्पा म्हणतात, पण त्यांना हे माहित नाही कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता. अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
मला नेहमी मोदी आणि शहांचा हस्तक म्हणून हिणवल जात, मात्र दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे विचार पुढे नेले.
मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरलं होत आता ते सांगणार नाही. माझ्यात तुमच्यात काय ठरल होत ते आता जाहीर करणार नाही? योग्य वेळ आली की जाहीर करेल. पवारांनी काय सांगितले ते ही योग्य वेळ आली की जाहीर करेल.
राज्याचे कंत्राट योग्य व्यक्तीच्या हाती गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भुरळ घातली, जगभर देशाचे नाव करता त्यांची टिंगल करता, गृहमंत्र्यांची टिंगल करता. ज्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्याची तुम्ही टिंगल करता आहेत.
बाळासाहेबांची आणि शरद पवार यांची मैत्री होती पण कधी युती केली नाही.
आम्ही जो निर्णय घेतला तेव्हा वाईट वाटल. मात्र अडीच वर्ष खदखद होती,त्याच गोष्टीचा तीन महिन्यांपूर्वी उद्रेक झाला.
शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. होय गद्दारी झाली? तुम्ही ज्या दिवशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत युती केली तेव्हाच गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली आहे.
आमच्या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. माध्यमांना सांगतो कॅमेरा वळून महाराष्ट्राच्या जनतेला हा अफाट जनसागर दाखवा. तुम्हाला आता कळल असेल खरी शिवसेना कोण आहे.हा प्रश्न आता पडणार नाही. बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार कोण आहे हेही कळाल असेल. आजच्या गर्दीने सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारणा तिलांजली दिली. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचा विचार गहाण टाकला. तुम्ही तुमचा इमान सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या हातात दिली. आम्ही ही भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेतली आहे. ते ही जाहीर भूमिका घेतली.
उध्दव साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे? तुमचे सर्व कुटुंब शिंदे साहेबांसोबत आहे. तुम्ही कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर या महाराष्ट्राच्या कुटुंबाला जनतेला कस सांभाळाल. उद्धव ठाकरे यांची नीती संपवण्याची आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला कस संपवायचे हे उद्धव ठाकरे करत असता.
मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचावर जोरदार निशाणा साधला. शोले चित्रपटाची डायलॉगबाजी करत कहा गया रे तिसरा, आता आहेत जेलमध्ये चक्की पिसिंग अन्ड पिसिंग अशा शब्दात यावेळी गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मेळाव्यात उपस्थित. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे माझ्या आवडीचे. मला मागील काही दिवसात फोने येतात विचारले जातेय तुम्ही शिंदे गटात गेलात, त्यावेळी मी म्हणालो की, अरे हे ठाकरे कोणच्या गोठ्यात बांधील राहू शकत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसीच्या मैदानावर दाखल झाले असून त्यांनी दसऱ्यानिमित्त भव्य दिव्य अश्या ५१ फुटाच्या तलवारीचे पूजन केले आहे.
गुलाबराव, तुमच्याकडे फोन आहे का? तुमच्या पाया पडतो. त्या उद्धव ठाकरेंना फोन करा आणि दोन मिनिटं इथे येऊन जा म्हणावं. खरी कोणीत शिवसेना आहे तुला कळेल.अशी जोरदार टीका करत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर आज दसरा मेळावा होत आहे. शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. यादरम्यान शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार असून आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शिंदे या मेळाव्यात काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.