राजकारण

आटपाडी बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा; गोपीचंद पडळकरांना जबरदस्त धक्का

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : अत्यंत संवेदनशील रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज झालेल्या सभापती निवडीमध्ये बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला.

शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करत गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये विरोधकांना गाफील ठेवत 10 विरुद्ध 8 मताने विजय मिळविला. व 9-9 समान जागा निवडून येऊनही शिवसेनेने बाजार समितीवर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का दिला आहे.

सभापती निवडीमध्ये भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीकडून सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व रासपाच्या आघाडीकडून सभापती पदासाठी शिवसेनेच्या संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.

दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पार पडले. मतदानांतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या संतोष पुजारी व काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांना प्रत्येकी दहा तर राष्ट्रवादीच्या हणमंतराव गायकवाड व दादासाहेब हुबाले यांना प्रत्येकी आठ मतदान झाले.

आटपाडी तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्हयाचे लक्ष आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे लागले होते. सकाळपासून निवडीकडे लोकांची उत्सुकता ताणली होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाकाची आतषबाजी करून आटपाडी शहरातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश