राजकारण

आदित्यनंतर तेजसपर्व! वाढदिनानिमित्त शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्राची स्थिती पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राची स्थिती पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिकांकडून बॅनरच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु करण्यात आले आहे.

तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर युवानेते तेजस साहेब ठाकरे यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकुर छापण्यात आला आहे.

शिवसेनेमध्ये सध्या उभी पुट पडला आहे. अनेक नेते शिवसेनेतून शिंदे गटात सामील होत आहेत. अशा स्थितीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. यामध्ये आता तेजस ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. परंतु, तेजस ठाकरे राजकारणात येण्याच्या शक्यता आदित्य ठाकरे व नेत्यांकडून फेटाळली आहे. मात्र, मातोश्रीकडून असे तेजय ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत संकेत मिळत आहेत. असे झाल्यास तेजस ठाकरेंना कोणती जबाबदारी मिळेते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कोण आहे तेजस ठाकरे?

तेजस ठाकरे यांचा वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे. तर, तेजस ठाकरे यांनी गेल्यावर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी