महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उद्या महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत फैसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणाला मिळतं आणि शिवसेना हे नाव कुणाकडे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे.
विशेष म्हणजे सुनावणीच्या आधीच ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपआपल्या विजयाचा दावा सुरु करण्यात आला. या दोघांसाठी ही सुनावणी फार महत्त्वाची आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची भूमिका ऐकून घेतली होती. आता उद्याच्या सुनावणी ठाकरे गट आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. या आधी 10 जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर लगेच पुढची सुनावणी उद्या होत आहे.
महत्वाचे म्हणजे 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या आणि अभूतपूर्व बंडानंतर ही बाळासाहेबांची पहिली जयंती असणार आहे. मात्र, जयंती आधीच निवडणूक आयोगातली लढाईही शिगेला पोहोचलेली असेल.