राजकारण

शिवसेना म्हणून मान्यता द्या; शिंदे गटाचं निवडणूक आयोगाला पत्र

Shivsena वर ताबा मिळवण्यासाठी आता शिंदे गटाचं पावले उचलण्यास सुरुवात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचाही पाठिंबा मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यश आले आहे. यामुळे शिंदे गटाचे बळ वाढले असून स्थानिक पातळीवरुनही शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आता शिवेसनेवर ताबा मिळवण्यासाठी आता शिंदे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, असे पत्र शिंदे गटांने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या घटना घडल्या आहेत. शिंदे यांनी १२ खासदारांसह त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून मान्यता दिली. तर, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर आता शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं असून यात शिवसेनेवर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेतील बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवी कार्यकारिणी नियुक्त केली आहे, असं शिंदे गटाने पत्रात म्हटलं आहे. यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाची मागणी मान्य केली तर शिवसेनेला मोठा धक्का असेल.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 18 जुलै रोजी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. तर, नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी