राजकारण

Gram Panchayat Election Result : मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना धक्का

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली.

मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंच पदी विराजमान झाले असून पिंपरी नांदू - ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश