राजकारण

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश

Published by : Dhanshree Shintre

पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. यानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राजेंद्र गावित यांना विचारूनच आपण उमेदवार बदलला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर खासदार गावित यांनी अतिशय संयमाने भूमिका घेतली. एकीकडे नाराजी दाखवताना दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत महायुतीला अडचणीत आणणार नाही, सावरा यांचेच काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार मतदारसंघात त्यांनी कामही सुरू केले होते. खासदार गावित यांची ही भूमिका लक्षात घेऊन भाजपने त्यांना तातडीने पक्षप्रवेश देऊन पालघर लोकसभा मतदारसंघात सावरा यांच्या पाठीमागे खासदार गावित यांचे बळ उभे केले आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाल्याचे पहायला मिळाले आहे. आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना आणि नंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी भाजपबरोबर आल्याने लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला. या सर्व घडामोडीत महायुतीतील पक्षांना आपल्या काही हक्कांच्या जागांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे त्या-त्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?