राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय वर्तुळात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जुंपलेली असती. याच दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र, नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरच आता शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर माध्यमांशी बोलताना शिरसाट की, राजकारणात भूमिका मागे पुढे करावी लागते. त्याशिवाय प्रकाश आबेडकरांची कोणाशी युती होईल, असे वाटत नाही. एकनाथ शिंदेबाबत त्यांचे मत त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत जास्त न ताणता योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करावी. आगामी महापालिकास, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा मेसेज त्यांना देता येईल. याबाबत ते लवकरच भूमिका जाहीर करतील. असे शिरसाट यावेळी म्हणाले.
भेटीनंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
निवडणूक ही ठाकरेंसोबतच लढवणार आहे. एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आहेत. शिंदेंनी जर भाजपाची साथ सोडली तरच ही राजकीय चर्चा होऊ शकते. आणि जर शिंदेंनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही विचार करु असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पॅंथर सेनेचे नाते शिंदेंना चांगलेच माहित आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल होणार नाही. भाजपासोबत युती करणार नाही. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार आहे. भाजपासोबत असणाऱ्या पक्षांना कधीच पाठिंबा नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.