Sanjay Gaikwad | Prasad Lad Team Lokshahi
राजकारण

लाड हे पाकिस्तान जन्माला आले का? संजय गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया

बापाच्या नावाचाही एकेरी शब्दात उल्लेख करता का?”, असा सवाल आमदार गायकवाड यांनी रावसाहेब दानवे यांना केला आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात मागील काही दिवसांपासून एकच राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे सतत राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद कायम असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील वादग्रस्त विधान केले त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यावरच विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

बुलढाण्याचे शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावर बोलताना म्हणाले की, प्रसाद लाड हे पाकिस्तान जन्माला आले का? हे तपासावे लागेल, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे.

तसेच रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने संजय गायकवाड हे आक्रमक झाले असून त्यांनी रावसाहेब दानवे यांचा देखील समाचार घेतला आहे. बापाच्या नावाचाही एकेरी शब्दात उल्लेख करता का?”, असा सवाल आमदार गायकवाड यांनी रावसाहेब दानवे यांना केला आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती केली. आणि संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण