राजकारण

अजित पवारांना धक्का! पुणे जिल्ह्यातील ८७५ कोटींच्या कामांना शिंदे सरकारचा ब्रेक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले, तर, दुसरीकडे शिंदे सरकारने अजित पवारांना झटका दिला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या ८७५ कोटींच्या कामाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारने कॅबिनेट बैठका घेत अनेक विकास कामांना मंजूरी दिली होती. त्याचे जीआरही काढण्यात आले होते. यावर राज्यपालांनी पत्र लिहून खुलासाही मागवला होता. यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच अ‍ॅक्शन मोडवर आले असून ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत आहे. अशातच अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याच्या कामांनाही ब्रेक लावला आहे. यासंबंधी एक पत्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आले आहे.

या पत्रात पुणे जिल्हा नियोजन समितीच्या ८७५ कोटींच्या विकास आराखड्यास पालकमंत्री अजित पवार यांनी घाईघाईने मान्यता दिली. या आराखड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना निधीचे बेसुमार वाटप करून शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या सदस्यांना अत्यंत नगण्य निधी देण्यात आला आहे, असा आक्षेप शिंदे सरकारने नोंदवला आहे. नाशिक जिल्ह्यात असाच प्रकार घडल्यानंतर आपण स्थगितीचे आदेश दिले होते, असे स्पष्टीकरणही शिंदे सरकारने पत्रात दिले आहे. पुणे जिल्ह्याच्या आराखड्यासदेखील स्थगिती देऊन नवीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निधीचे समन्यायी पद्धतीने फेरवाटप करण्यात यावे, असे निर्देश शिंदे सरकारने दिले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो-3 लाईन कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तर, शिंदे सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळांची नाशिकमधील ६०० कोटींच्या निधींची कामे रोखण्याचा निर्णय घेतला होता.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला