अधिवेशन सुरु झाले असून प्रथम नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय देण्यात आला. यानंतर विधानसभेत राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
हे गद्दारांचे सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे. हे लवकरच कोसळणार आहे. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. तर, शंभूराज देसाई यांनी सभागृहात उत्तर देऊ, असे सांगितले आहे.
बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. आले रे आले गद्दार आले, पन्नास खोके एकदम ओक्के अशी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
मुंबई : बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.