राजकारण

शिंदे सरकारचा खडसेंना पुन्हा धक्का; नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक निलंबित

भुसावळ नगरपालिकेचे खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : भुसावळ नगरपालिकेचे खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा धक्का दिला आहे.

2016 च्या निवडणुकीत तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात भुसावळ नगरपालिकेत कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक अमोल इंगळे , लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, एडवोकेट बोधराज दगडू चौधरी , शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते व शैलाजा पुरुषोत्तम नारखेडे हे निवडून आले होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांनी भुसावळ नगरपालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या काही दिवसा अगोदर 17 डिसेंबर 2021 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

या विरोधात तत्कालीन भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांविरुद्ध पक्ष बंदी कायदा अंतर्गत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 18जुलै 2022 रोजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना अपात्र केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपात्र करण्यात आलेल्या तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी शासनाकडे अपील दाखल केली होती. यावर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेला अपील फेटाळली असून तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकाचे जिल्हाधिकाऱ्यांचे अपात्रतेचे आदेश कायम ठेवत प्रधान सचिवांनी अपात्र नगराध्यक्ष व नगरसेवकांना 6 वर्षासाठी निलंबित केले आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक मंडळाची नियुक्ती करून शिंदे-फडणवीस सरकारने एकनाथ खडसेंना धक्का दिला होता. याप्रकरणी न्यायालयाने एकनाथ खडसेंना दिलासा दिला असला तरी आता नगर विकास विभागाने भुसावळ नगरपालिकेचे खडसे समर्थक तत्कालीन नगराध्यक्ष व नगराध्यक्षांना 6 वर्षासाठी निलंबित करून पुन्हा एकदा मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news