राजकारण

साताऱ्याचे आमदार महेश शिंदेंवर शशिकांत शिंदेंची टीका; म्हणाले...

Published by : Dhanshree Shintre

आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या चांगलीच जुंपलेली असून यामुळे कोरेगावचा राजकारण ऐन पावसाळ्यात तापलेलं पाहायला मिळत आहे. आमदार शशिकांत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते यांनी काल आ. महेश शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने आज शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

महेश शिंदे तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या मार्गाने सामोरे जा. तुम्ही घाबरलेल्या असल्यानेच उपरा वगैरे शब्द वापरत आहात. मी 35 वर्ष साताऱ्यातच राजकारण करत आहे. उलट तुम्ही ब्राझील वरून येथे आल्यामुळे तुम्हीच उपरे आहात असा सणसणाची टोला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना लावला असून पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. जिल्ह्यातल्या राजकारणातील लोकांनी जर कुरबोड्या केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्म सुद्धा झाला नसता आणि तुम्ही अपघाताने आमदार झाले आहात. तुमची बहिण तुमच्या सौभाग्यवती मतदारसंघात फिरतात मग तुम्ही काय वारसा हक्क लावत नाही का?

माझी लासुरण्यात मतदान यादीमध्ये नोंदणी आहे. त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका. तुम्ही शंभर टक्के यावेळेस निवडणुकीत पडणार म्हणजे पडणार आहात. वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता, त्यामुळे तुमच्या वाईट प्रवृत्तीला मी आणि माझे सहकार्य गाडणार आहेत. जनतेच्या पैशावर आपण कसे दरोडे टाकत आहात याचे पुरावे मी सादर करणार आहे. तुमच्या वागणुकीची सुद्धा मी पोलखोल करणार असून राजकारणात घर फोडणे गाव फोडणे ही पद्धत तुमची आहे. जी लोक माझ्यापासून त्यांच्याकडे गेलेत त्यांना लखलाभ जे दबावाखाली गेले ते पुन्हा येतील असा विश्वास शशिकांत शिंदे कोरेगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने