दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या पाठीशी शर्मिला ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही अशा चौकश्यांतून गेलो असल्याचं म्हणत आदित्यची पाठराखण केलीये.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या की, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय. असे शर्मिला ठाकरे म्हणाले होत्या. यावर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत.
यावर शर्मिला ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही.मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला; तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा. असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.