राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज ठाणे दौऱ्यावर होते, पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा दौरा होता अशी माहिती समोर आली आहे. तेव्हा त्यांनी भाजपने दिलेल्या आश्वासनाच्या आकडेवारीचा संदर्भ घेत पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी चांगलच धारेवर धरलं.
पत्रकार परिषेद मध्ये बोलताना ते म्हणाले की, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत.
या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे. 2014 साली यांनी अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. या सोबतच त्यांनी अन्य काही मुद्द्यांवरून भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
भाजपचा कार्यकाळात सर्वाधिक महिलांवर अत्याचार होत असे आरोप लावत शरद पवार म्हणाले की, गुजरात मध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामधे सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली आणि आता गुजरात सरकारने त्यांना सोडलं आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदींच्या राज्यात एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आलं आहे. असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.
पुढे बोलताना त्यांनी ईडीवरून सुद्धा भाजपला निशाणा केलाय. कुणाच्या पाठी ईडी, सीबीआय लावता येईल का याचा प्रयत्न करण्यात येतोय. ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही त्या ठिकाणी कारवाई होताना पहायला मिळतंय. विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार नव्हतं. परंतु काही आमदार सोबत घेऊन सरकार बनवलं. महाराष्ट्रात देखील असं झालं. मध्यप्रदेशमध्येही हेच झालं. असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केला आहे.
24 तास वीज देणार असल्याची घोषणा फुसकी
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वासर्वे शरद पवार यांनी वीज पुरवठ्याबद्दल एक महत्वपूर्ण माहिती समोर आणली. भाजपने 2022 पर्यंत प्रत्येकाला 24 तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण केलेलं नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्रानेच दिली आहे.
संपूर्ण राज्याचा करणार दौरा
ठाण्यात आज बोलत असताना राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, माझा प्रयत्न असा राहणार आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्यांची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे. अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.