राज्यात एकीकडे राजकीय संघर्ष वाढतच चालला आहे.तर दुसरीकडे या राजकीय घडामोडीदरम्यान शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे आणि शिवसेनेत वादंग सुरु झाले आहे. दोन्हीकडून जोरदार उत्तर-प्रत्युत्तर देण्याचे काम सध्या सुरु आहे. शिवसेना नक्की कोणाची ? हा प्रश्न कोर्टात असताना, यंदाचा दसरा मेळाव्याचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला दिला आहे.
काय दिला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला ?
दसरा मेळाव्यावरून शिंदे- शिवसेनेत वाद सुरु असताना त्यावर आता बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सामोपचाराने गोष्टी होईल याकडे लक्ष द्यावे," असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.
शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज
महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याची परवानगीसाठी शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
शिंदे गटाचा मेळाव्याला राज ठाकरे राहणार उपस्थित ?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? की शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित दसरा मेळावा घेणार ? यावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातायत, त्यांना दसरा मेळाव्याचे आमच्याकडून आमंत्रण दिले जाईल. राज ठाकरे देखील हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जातायत तर त्यांनादेखील आमंत्रण दिले जाईल असं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटल आहे.