sharad pawar | chandrakant patil team lokshahi
राजकारण

चंद्रकांत पाटील म्हणाले मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांनी लगावला टोला

एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो आहोत, चंद्रकांत पाटील

Published by : Shubham Tate

sharad pawar statement on chandrakant patil : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे. तसेच राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधताना. यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते यावेळी बोलताना म्हणाले की, दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. (sharad pawar statement on chandrakant patil comment on eknath shinde)

शरद पवार यांनी नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पनवेल येथील कार्यक्रमात मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य केलं. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता त्यांनी अस विधान केलं आहे.

पनवेलमध्ये आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. "आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो आहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी