राजकारण

शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध? शरद पवार म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याचे संकेत अनेकदा प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत. परंतु, या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला होता. यावर स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्दयांवर भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

शरद पवार म्हणाले की, सीमाभागाची केस कोर्टात सुरू आहे. यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन केसमध्ये नीट म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. अंतिम निर्णय आल्यास समाधानाची गोष्ट आहे. हरिश साळवे यांना वकील नेमण्याबाबत सर्वांचे एकमत झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीने एकत्रित पावले टाकावी. वंचितसह आणखी काही गटांना सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. आमच्यात मतभेद सुरू असतील तर त्यावर चर्चा होईल. भाजप सोबत संघर्ष होईलच. सत्ता हातात असेल त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असत. टोकाला जाण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शिवसेनेमध्ये गट पडले हे खरे आहे. कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. निवडणुका येतील त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत हे समजतील. संजय राऊत यांच्याकडून जाणून घेईल. सरकार फेब्रुवारीमध्ये पाडण्याचा त्यांचा काही प्लॅन आहे का, असे मिश्कील उत्तरही त्यांनी दिले आहे.

राज्यपाल नाखूष असतील तर आम्हीही सगळे नाखूष आहोत. अनके चांगले राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत. त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले. हे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारींकडून राखली जात नाही, अशी टीका शरद पवारांनी राज्यपालांवर केली आहे.

भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधींवर टीका होत आहे. हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असे स्वरूप ठेवले नाही. अनेक जण पाठिंबा देत आहेत. गांधीजींच्या विचारांच्या संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. सामान्य लोकांची राहुल गांधींच्या पदयात्रेला उपस्थिती आणि सहानुभूती दिसते आहे. राहुल गांधींचा दृष्टीकोन दुषित करण्याचा प्रयत्न होता त्याला हे उत्तर आहे. विरोधी पक्षात एकवाक्यता यामुळे होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राम मंदिराच्या पुजारीनी तारीख सांगितली असती तर बरं झालं असतं. गृहमंत्र्यांचा हा विषय आहे की नाही मला माहित नाही. देशाच्या मूळ प्रश्नांला बगल देण्यासाठी राम मंदिराचे वक्तव्य केले आहे, असा टोला शरद पवारांनी म्हंटले आहे.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार