मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंची प्रकृती आणि राज्यचं चित्र बदलण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राज्यपालांना भेटायला जाणार आहे. जी काही मागणी करत आहेत त्यांची पूर्तता केली पाहिजे आणि ही मागणी पूर्ण करताना दुसऱ्याच्या ताटातलं घेतल नाही पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि हाच अर्ज घेऊन जयंत पाटील जाणार आहे. जरांगेंची प्रकृती आणि राज्यच चित्र बदलण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
सत्ता बदलते, तुम्ही सगळ्यांनी हिंदुस्थानचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा. देशात आज भाजपची सत्ता आहे. पण प्रांतामध्ये केरळ, तेलंगणा आणि इतर राज्यात सत्ता नाही. म्हाराष्ट्रात खोके दिले आणि सरकार आणलं, गोवा-मध्य प्रदेश माणस फोडली आणि सरकार आणलं. सर्व राज्यात पाहिल तर नाहीचे बहुमत आहे, लोकांना बदल हवा आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करायचं आहे. काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरेंचा शिवसेना असो किंवा शेतकऱ्यांच्या पक्ष असो आपण एकत्र येऊन आपले मत मांडू. हे सरकार बदलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.