Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

हा बदल पुण्यात होतोयं याचा अर्थ...; शरद पवारांची कसबा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया

कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडी कसब्यात विजयी झाली असून भाजपने चिंचवडमध्ये जागा राखली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडी कसब्यात विजयी झाली असून भाजपने चिंचवडमध्ये जागा राखली आहे. यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीमधील मी माहिती घेतली. हा बदल आहे तो पुण्यात होत आहे. याचा अर्थ लोक वेगळ्या विचाराच्या प्रक्रियेत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पोटनिवडणुका, पदवीधर निवडणुका जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एक सुद्धा जागा मिळू शकली नाही. सरकारकडून सत्तेच्या वापर होत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे. त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

मी दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती मिळाली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना देखील कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे वाईट, अशी टीका त्यांनी केली आहे.

नागालँड निवडणुकीचाही निकाल समोर आला असून यात राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँड मध्ये 12 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्ष हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मी नागालँडच्या जनतेचा आभारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकार्यानी उभ्या केल्या होत्या. त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही यामध्ये असून सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. आणि हे आणि हे लोकशाही मधील चांगला निर्णय असल्याचेही शरद पवारांनी म्हंटले आहे.

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

Matheran | कड्यावरच्या गणपती परिसरात बिबट्याचा वावर ; व्हायरल फोटोने खळबळ