राजकारण

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरवण्याचा निर्णय शरद पवारांनी सोपवला 'या' नेत्यांच्या खांद्यावर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले गेले आहे. यावेळी भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. तर, राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण हे ठरवण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही सांगितलं. या सामितीची नावही त्यांनी सुचवली आहेत.

शरद पवार म्हणाले की, मागील ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो. ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

या समितीत सुचवलेली नावे

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन.

तसेच, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई , दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा धास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो, आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार., असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?