राजकारण

संधी असतानाही अजितदादांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही; फडणवीसांचा चिमटा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी हिवाळी अधिवेशनात विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी केली. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटते की 2004 मध्ये संधी असतानाही अजितदादांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही, असा राजकीय चिमटा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना काढला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी आज अनेक गोष्टींची चर्चा केली कोण मुख्यमंत्री झाले? कुठले मुख्यमंत्री झाले? पण, एका गोष्टीचं दुःख मला वाटतं आहे. २००४ मध्ये संधी असतानाही अजित पवारांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केले नाही. तुमचे जास्त लोकं निवडून आली होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार होता. पण, ती संधी तुम्हाला मिळाली नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

अजित पवार यांचे भाषण नेहमीच रोखठोक असते. पण, यंदा १०० टक्के भाषण अजित पवारांचे वाटत नव्हते. ५० टक्के जयंत पाटील यांचही होते. जयंत पाटील सभागृहात नसल्याने अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास होत होता. वीज तोडण्याचा जीआर मी ट्वीट देखील केला. तरीही तुम्हाला सापडले नाही. त्यामुळे अजित पवार तुम्ही मला आता ट्विटरवर फॉलो करा, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी