Devendra Fadnavis | Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; शरद पवारांचे मोठे विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि मविआने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, असा आरोप त्यांनी केला आहे.

मतदार यावा असे आवाहन केले तर त्यात काही गैर नाही. तो मतदार नसेल तर हरकत घेणे ठीक आहे. नाहीतर कळत-नकळत त्यास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न आहे. जात, पात, धर्म असे चुकीचे मार्ग प्रसारासाठी भाजपाकडून वापरणे हे नवे नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तर, ठाकरे गाटाकडून सातत्याने मध्यावधी निवडणुकांचे आव्हान देण्यात येत आहे. यावर मध्यावधी निवडणुका लागतील असं मला वाटत नाही, असा घरचा आहेर त्यांनी दिला आहे.

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केल्याने एकच राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. यावर मी गमतीत बोललो होतो. माझ्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकते म्हणजे इतके माझे महत्व आहे. चांगल आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

सत्ताधारी पक्ष कोणत्याही थराला जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. विकासाच्या कामांना गती देण्याचे काम सरकारकडून होत नाही. त्यामुळे गौप्यस्फोटसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. कांदा कापूस सर्व गोष्टींचे दर कमी झाले आहेत. राज्य व केंद्र सरकारने तोडगा काढला पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने