मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भोंदूबाबा असल्याचे विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या विधानाचा राष्ट्रवादीने निषेध केला असून जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही बावनकुळे व भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. बावनकुळेंची ती पात्रता नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे भोंदू बाबा दाढी वाढवत असतात. भाजप अंधश्रध्देला खतपाणी घालत आहेत. बावनकुळेंची ती पात्रता नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. गुलाबराव पाटील बोलले, अब्दुल सत्तार बोलले यांना सत्तेची मस्ती आली आहे. बावनकुळे यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भाजपला विषारी वातावरण निर्माण करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात हे आहे त्यामुळे त्यांचे नेते बोलत आहेत, असा आरोपही अमोल मिटकरींनी केला आहे. त्यांच्याकडून कटुता कमी होईल अशी अपेक्षा करू नये, असा टोलाही मिटकरींनी लगावला आहे.
पवार यांनी काय केलं आहे हे सगळ्यांना माहित आहे. निवडणुकीच्या तोंडावर पवार साहेबांचं नाव घेऊन हे सगळे पुढे जात आहेत. जश्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांची पळता भुई थोडी केली तशीच हालत आम्ही बावनकुळेंची करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता खास करून राष्ट्रवादीने केला होता. शरद पवारांच्या ताब्यात कोण आला तर तो सुटत नाही असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे असा टोला शरद पवारांना लागवलाय.