राजकारण

शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा एकत्र प्रवास; चर्चांना उधाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीनंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ झाला आहे. अशातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकत्र प्रवास केल्याचे समोर आले आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. तरी शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्या एकत्रित प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जळगाव जिल्हा दौऱ्यावर जात असलेले शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांनी रेल्वे गाडीतून एकाच बोगीतून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. या प्रवासादरम्यान दोन्हीही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील हे मुंबईकडून जळगावकडे जात आहेत. तर त्याच गाडीने जळगाव दौऱ्यावर जाण्यासाठी शरद पवार हेदेखील प्रवास करत आहेत. त्यामुळे शरद पवार व गुलाबराव पाटील हे मुंबई ते जळगाव असा प्रवास एकत्रित करत आहेत. त्यामुळे या प्रवासादरम्यान नेमकी काय चर्चा झाली आहे याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला