थोडक्यात
यंदा बारामतीत पवार कुटुंबियांचे दोन दिवाळी पाडवे
गोविंद बागेत शरद पवारांचा पाडवा
काटेवाडीत अजित पवारांचा पाडवा
बारामतीत आज पवार कुटुंबाचे दोन वेगवेगळे पाडवे पाहायला मिळणार आहेत. बारामती मधील गोविंद बागेत शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा पाडवा असणार आहे तर तर काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाडवा पाहायला मिळणार आहे.
बारामतीत गोविंदबाग येथे दरवर्षी पवार कुटुंबाच्यावतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यामध्ये पवार कुटुंब आणि बारामतीकरांच्या भेटीगाठी घेत असते. मात्र यंदा बारामतीत दोन्ही पवारांचा पाडवा वेगवेगळा होणार आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
त्यामुळे आज शरद पवार गोविंद बाग येथ तर अजित पवार काटेवाडीत पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत. यातच विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे मैदानात आहेत.