मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रविवारी मंत्रिपदांची विभागणीही झाली आहे. परंतु, अनेक मोठी खाती भाजपकडे गेल्याने शिंदे गटातील मंत्री नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. काहींनी ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली. परंतु, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी कोणीही मंत्री नाराज झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, आम्ही आमचे अधिकार सगळे पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत, असेही सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले की, कोणीही मंत्री नाराज झालेले नाहीत. कोणीही आपलं मत दिलेल नाही. कोणीतरी वावड्या उठवत आहे आणि का ते माहित नाही. आम्ही आमचे अधिकार सगळे पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत. जो प्रभाग दिलेला आहे त्यात मुख्यमंत्री यांना अभिप्रेत काम करण्यावर भर देण्यात येईल. कुठलं खातं कोणाला द्यायचं हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे, असे
एका उपहारगहाची पाहणी करीत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून आमदार संतोष बांगर यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली. यामुळे एकच खळबळ माजील असून सत्तेची हवा डोक्यात गेल्याची टीका होत होती. यावर शंभूराज देसाई यांनी आमदार बांगर तिथे गेले आणि त्याचा आढावा घेतला. ज्या बाबी निश्चित केलेला आहे. परंतु, त्याप्रमाणे नव्हते. बांगर यांच्याकडून अनावधानाने झालं असावं. सत्ता डोक्यात जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आम्ही सगळे काम करणाऱ्यांपैकी आहोत. कोणाच्याही डोक्यात सत्ता जाणार नाही, अशी सारवासारव केली.
दरम्यान, विधिमंडळाचे उद्या अधिवेशन आहे. विरोधी पक्ष नेते सदस्यांना चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. जे कामकाज आहे त्या अनुषंगाने आज चर्चा होईल. पुरवणी मागण्या होतील, वेगवेगळ्या विभागात होणाऱ्या चर्चा होतील. 17 ते 25 या कालावधीत निश्चित ठरलेलं कामकाज हे सुरळीत चालू ठेवण्याच काम आम्ही करू. येणाऱ्या अधिवेशनात सकारात्मक सूचनेत आम्ही बदल करू, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.