राजकारण

राऊत स्वातंत्र्य लढ्यामध्ये तीन महिने आत जाऊन आलेत का? शंभूराज देसाईंची खोचक टीका

शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : शिंदे गटात कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देसाईंनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत स्वातंत्र्य लढ्यामध्ये तीन महिने आत जाऊन आले का, असा खोचक टोला शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, शिंदे गटात कुठलीही नाराजी नसून आमदार महेश शिंदे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्यांना जेवत्या ताटावर उठवल गेले आहे. ती मंडळी नाराज असून ती ठाकरे गटातील आहेत. जे नाराज आहेत त्यांचे नाव मला सांगा. मग मी सांगेन त्यांच्यासाठी मी कोणकोणती कामे केली आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांच्या बोलण्याचा आम्हाला फरक पडत नाही. ते काय स्वतंत्र लढ्यामध्ये तीन महिने आत जाऊन आले का? त्यांच्यावर कसला शिक्का आहे? संजय राऊत यांनी आता शांत बसावे. साडेतीन महिने त्यांनी आराम केला आहे. त्यामुळे त्यांना आता सवय लागली आहे आराम करण्याची. त्यांना आता सोसणार नाही त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्ला शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आदर्श आणि आदराचे स्थान हे आमच्या मनात आहे. संजय राऊत यांनी आम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. आम्ही जो उठाव केला त्याची सल संजय राऊत यांच्या मनातून निघत नाही. त्यामुळे नैराश्यपोटी संजय राऊत वेळोवेळी असे बोलत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत आम्ही जे दोन-तीन महिन्यांमध्ये केले त्याच्यापैकी अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? याचा पाढा संजय राऊत यांनी आमच्यासमोर येऊन वाचावा. संजय राऊत अज्ञातवासात असताना महाराष्ट्र शांत होता, महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे, असा खोचक टोला संजय राऊत यांना शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री केवळ 40 आमदारांचा आहे. तीन महिन्यापूर्वी आम्ही क्रांती केली. या पलीकडे बोलत नाही. साडेतीन महिन्यानंतर पुन्हा आमचा मुख्यमंत्री होईल. आम्ही सरदार आहेत लढायला वार झेलायला. जे जाताय ते पालापाचोळा आहे ते इकडे तिकडे उडत असतात. जे शिंदे गटात गेले त्यांनी निवडून येऊन दाखवावे. ठिणग्या उडताय उडू द्या, असे म्हणत शिंदे गटात आलबेल नसल्याचे संकेत राऊतांनी दिले होते.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण