राजकारण

सहनशीलता संपली, आता कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर; शंभूराज देसाईंचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : राज्याची एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी कर्नाटक विधानसभेत घेतली. सीमा वादावर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आता तापले आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी अरेरावी केली. याचा शिंदे फडणवीस सरकारने निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना अशा भाषा वापरणे शोभत नाही. अरेरावीची भाषा करू नये. आता विधान केली तर तश्याचं तस उत्तर देऊ. शिंदे फडणवीस सरकार आता कर्नाटक सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषिकांना सांगतो की त्यांनी घाबरू नये. सीमावर्ती भागातील जनतेसोबत आम्ही आहोत. एकही इंच जागा सोडणार नाही. सहन करायला काही मर्यादा असते असते. सहनशीलता संपली आता कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शंभूराज देसाई यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

दरम्यान, बोम्मई यांनी विधानसभेत सांगितले की जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमा प्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणारा ठराव मंजूर करू. सभागृहातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. व कोणत्याही वादाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि महाजन आयोगाच्या अहवालासोबतच सीमाप्रश्नावर तोडगा निघाला आहे, सिद्धरामय्या म्हणाले आहेत.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड